आज एक गोष्ट स्पष्ट करतो की मराठी मालिकांविषयी केलेली गेल्या वेळेची post ही केवळ उपहासात्मकच होती.
अर्थात हे सांगावं लागतय याचचं वाईट वाटतय.
असो. अशा जरी वाईट मालिकांचा भरणा मराठी Television मध्ये असला तरी ज्या काही छान , सुंदर मालिका आहेत त्या आहेतच.
केदार शिंदे यांची श्रीयुत गंगाधर टिपरे ही एक सहज सुंदर Evergreen मालिका दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाने नटलेली !
त्यानंतरच्या काळात आभाळमाया, उंच माझा झोका, पिंपळपान, मधू इथे अन चंद्र तिथे अशा काही चांगल्या दर्जेदार मालिका येऊन गेल्या पण त्याही केवळ थोड्याच.
आज मी जरा अशा दोन दिग्दर्शकांच्या कलाकृतींबद्दल बोलायचे म्हणतो ज्यांनी सातत्याने मराठी Television मध्ये काहीतरी विशेष देण्याचा प्रयत्न केला...
यामध्ये अग्रक्रमी नाव येतं ते म्हणजे सतीश राजवडेच्या मलिकांच !

असंभव, अग्निहोत्र, गुंतता ह्रुदय हे, एका लग्नाची दुसरी गोष्ट ह्या त्याने दिग्दर्शित केलेल्या मालिका.
असंभव आणि अग्निहोत्र ह्या suspense, thriller, family drama प्रकारात मोडणाऱ्या या मालिका खरंच शेवट पर्यंत खिळवून ठेवणाऱ्या होत्या.

गुंतता ह्रुदय हे ही विवाह बाह्य संबंधावरील ही मालिका तितकीच उत्कंठावर्धक होती.
एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेमध्ये तो स्वप्निल आणि मुक्ता ही मुंबई पुणे मुंबई मधील hit जोडी छोट्या पडद्यावर घेऊन आला आणि तितक्याच सहज सुंदर पद्धतीने ही दुसरी गोष्ट त्याने मांडली.

या सर्व मालिकांमध्ये त्याला साथ मिळाली ती उत्तम कथानक, संगीत आणि त्यातील कलाकारांची...मोहन आगाशे, विक्रम गोखले, शरद पोंक्षे, स्वप्नील जोशी, संदीप कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, विनय आपटे, मोहन जोशी, इला भाटे, मुक्ता बर्वे, सुहास जोशी आणि असे बरेच दिग्गज मंडळी.
त्यानंतर नाव येते ते विनोद लवेकर याचे. हा सतीश राजवाडे चा सहाय्यक दिग्दर्शक आणि तितक्याच ताकदीचा आणि कमालीचा.
गेल्या वर्षी सुरु झालेली दिल दोस्ती दुनियादारी ही त्याची स्वतंत्र अशी पहिली मालिका म्हणजे उत्साहाचा झराचं. सहा मित्रांच्या या मैत्रीने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आणि तरुण प्रेक्षक वर्गाला पुन्हा मराठी Television कडे वळवले.
आत्ता सुरु असलेली विनोद लवेकर आणि संदेश कुलकर्णी या जोडगोळीची झी युवा वरील बन मस्का ही एक Twisted Love story. तेवढीच छान आणि मस्त.

पण मग त्यानंतर ही चांगल्या मालिकांची यादी इथेच संपते.
तसा आत्तापर्यंत काही जणांनी नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न कालय तस्मै नमः, गुंडा पुरूष देव, रात्रीस खेळ चाले मधून केला पण तो पूर्णतः यशस्वी नाही झाला.
चांगल्या मालिका मराठी मध्ये यायला हव्यात, मराठी चित्रपटांप्रमाणे Television ला पण बदलायला हवं हे खरंच आहे किंबहुना गरजेचं आहे.

पण आपण सुद्धा फक्त इंग्रजी मालिका पुन्हा पुन्हा पाहण्यापेक्षा अथवा अर्थहीन कौटुंबिक मालिका पाहण्यापेक्षा या काही उत्तम मराठी मालिकांचा आस्वाद YouTube, Voot, ditto, Ozee या संकेतस्थळांवर घेणं योग्य ठरेल.
- आशुतोष :)

Comments

Popular Posts