बाहुबली द कनक्ल्युजन: मनोरंजनात्मक चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांसाठी भगवतगीता !
एस. एस. राजमाऊलींनी भारतीय सिने रसिकांना एक स्वप्नवत दुनिया दाखवली, भारतीय प्रेक्षकांना संस्मरणीय, मनोरंजनाने ओथंबून वाहणारा अनुभव, आनंद दिला. त्यांनी आणि त्यांच्या टीमने जे जगलं, ते आपण प्रेक्षकांनी दोन चित्रपटांच्या रूपाने अनुभवलं. अखंड ७ वर्षे ऑन रेकॉर्ड (तसं पाहता त्यांच्या कॉलेज पासून म्हणजे साधारण २० वर्षे) या माणसाने प्रचंड मेहनत घेऊन हे भलं मोठं (ज्यांनी कनक्ल्युजन पाहिला नाही, त्यांना इमॅजिन होणार नाही. फुकटचा विचार करू नये) साकार केलं.
आपणसुद्धा असं ग्रेट, ग्रँड उभं करू शकतो असा लाखमोलाचा विश्वास भारतीय दिग्दर्शक, निर्मात्यांच्या मनात रुजवला (आत्ताच्या मिथिकल स्टोरीज साय फाय मध्ये सुद्धा बदलतील). मार्व्हल, DC चे सुपरहिरो डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या माझ्या आणि माझ्या नंतरच्या पिढीला स्वतःच्या मातीतला बाहुबली सारखा सुपरहिरो आणि भल्लालदेवा सारखा सुपरव्हीलन दिला. (म्हणजे मी इथून पुढे फेव्हरेट सुपरहिरो म्हणून आधी बाहुबलीचं आणि मग स्पायडी, बॅटमॅन चं नाव घेईन !)
मॅट्रिक्स, ग्लॅडिएटर, मॅड मॅक्स, बेन हर, अवतार, गेम ऑफ थ्रोन्स सारख्या चित्रपट, मालिकेतील भव्यदिव्यता पाहून अवाक होणाऱ्या आणि आपल्या भारतात असं का होत नाही असे प्रश्न पडणाऱ्या प्रेक्षकांना ओव्हरव्हेल्म होणारा जिवंत अनुभव दिला. मी कनक्ल्युजन ची तुलना हॉलिवूड ऍक्शनशी टाळेन. कारण ती मला बऱ्याच ठिकाणी त्यापेक्षा सरस वाटली. कुंतला राज्यावर आक्रमण झाल्यावरची ऍक्शन माझी आत्तापर्यंतची सर्वात फेव्हरेट आहे, असं मी अभिमानाने सांगेन.
ते सर्व साम्राज्य (मी सेट म्हणून त्याची भव्यता कमी करणार नाही !) उभारण्यामागचे अथक आणि पराकोटीचे परिश्रम, समस्या आपण इथे घरी अथवा थिएटर मध्ये बसून इमॅजिन नाही करू शकत.
काल घरी चित्रपट पाहून आल्यावर बाबांशी बोलत असताना...
बाबा: असं आपल्याकडे कधी होणार ?
मी: म्हणजे ?
बाबा: हा साऊथ इंडस्ट्रीचा झाला ना !
मी: (छाती फुगवून, अभिमानाने) अहो ! हा आपला, आपल्या 'भारताचा' सिनेमा आहे.
अगदी मी, माझा मित्र अभय सारख्या सिने रासिकांपासून, क्षितिज पटवर्धन, राम गोपाल वर्मा यांच्या सारख्या सिने इंडस्ट्रीतील लोकांपर्यंत, विदेशी सेन्सर बोर्डापासून तेथील प्रेक्षकांपर्यंत सर्वांनी बाहुबलीवर अगणित कौतुकाचा वर्षाव केला आहे. आणि या सगळ्यात चित्रपटाला नावं ठेवणारी, कमी लेखणारी माणसं आहेत, ती असणार आणि ती असुदेत. ऑफ बिट आवडणारे प्रेक्षक (मला सुद्धा आवडतात) कोर्ट मला बाहुबली पेक्षा आवडतो असं म्हणून आपलं अज्ञान आणि अतिशहाणपणा उघड करत आहेत. पण मला या कशाचीच फिकीर नाहीये. मला बाहुबली: द कनक्ल्युजन प्रचंड आवडला आहे. टाळ्या, शिट्ट्या, सरसरून अंगावर येणार काटा, शरीरातून वाहणारं सळसळतं रक्त, तुफ्फान सिक्रीट होणारं Adrenalin या सर्वांसहित मी तो रोमहर्षक अनुभव घेतला आहे.
प्रभास ने साकारलेला आभाळाएवढा बाहुबली, देवसेना(अनुष्का शेट्टी) चे दैदीप्यमन डोळे, इतर सर्व कलाकारांची छान कामे, भारावून टाकणारा बॅकग्राउंड स्कोअर, रोमांचित करून टाकणारा टायटल सिक्वेन्स, डोळ्यांचे पारणे फिटणारी भव्यता, पहिल्या भागाशी असणारा स्ट्रॉंग कनेक्ट, एकसंध कथानक, अतिसूक्ष्म डिटेलिंग, जबरी ऍक्शन असं बरंच काही भरभरून कौतुक करण्यासारखं, पहिल्या भागापेक्षा सरस कनक्ल्युजन मध्ये आहे.
भरपूर थक्क करणारे प्रसंग, प्रचंड आनंद देणाऱ्या फ्रेम्स अनुभवण्यासाठी मी पुन्हा एकदा तो पाहेनच.
पायरसी होत आहे. बाजारात प्रिंट येऊन चित्रपटाला गर्दी न होण्यासाठी तो छोटा चित्रपट थोडीच आहे !
भारतीय सिनेसृष्टीची गणितं कायमची बदलायला आला आहे बाहुबली.
आणि तो बदलणार !
I witnessed it in Theatre.
एस. एस. राजामाऊली(दिग्दर्शक, पटकथा लेखक), शोभु यार्लगड्डा, प्रसाद देवीनेनी(निर्माते), के. व्हि. प्रसाद(कथा), एम. एम. किरवाणी(संगीत दिग्दर्शक), के. के. कुमार(सिनेमॅटोग्राफर), कोटागिरी राव(एडिटर), प्रभास, राणा, अनुष्का, तमन्ना, नासर, सथ्यराज आणि इतर सर्व कास्ट- क्रुला, त्यांच्या डेडिकेशन, डिव्होशन आणि डिटरमिनेशन ला माझा साष्टांग नमस्कार
जय माहिष्मते !

Very Nice review...Great work. Without disclosing story you've convinced me to watch this film. :)
ReplyDeleteThanks :)
DeleteTotally agree ashutosh.i enjoyed every bit of it too...Grand cinema...must watch
DeleteYeah. It's Great and Grand work. Thanks 😊
Delete