ती सध्या काय करते...

सतीश राजवाडे हा ऑल राऊंडर दिग्दर्शक... मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन या दोन्ही ठिकाणी आणि बहुतेक सगळ्या जॉनरमध्ये.
बहुतेक त्याचे सगळेच चित्रपट मी थेटरात पाहिले आहेत. हा राहतोय की काय असं वाटत होतं, पण आज पाहिला.
'ती सध्या काय करते' मध्ये दिग्दर्शक नवीन कथा घेऊन आलाय. आणि खूप परफेक्ट टायटल निवडलंय.
चित्रपट सुरु होताच तो मूळ कथानकाला हात घालतो. आणि कथा फ्लॅशबॅक मध्ये जाते. आयुष्याचे तीन टप्पे दाखवताना... पहिल्या टप्प्यात चेहऱ्यावर एक छान स्माईल येतं. तिसरा टप्पा सुद्धा तरल आणि एकदम मॅच्युअर्ड आहे. पण घोळ (मोठ्ठा घोळ) होतो तो दुसऱ्या टप्प्यात. केवळ २ तासांचा असणारा चित्रपट या टप्प्यात कमालीचा कंटाळवाणा होतो. आणि हा टप्पा चित्रपटात जास्त वेळासाठी आहे हे सुद्धा दुर्दैवचं. आत्ता पर्यंत कॉलेज मधील हा काळ बऱ्याच चित्रपटात येऊन गेल्यामुळे त्याचं आकर्षण कमी झालं असावं. आणि त्यात भर म्हणून अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर चा अभिनय. म्हणजे 'अभिनय' बरा तरी आहे. पण आर्या पूरती फ्लॅट आहे.
अजून एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे चित्रपटातील गाणी. ती श्रवणीय जरी असली तरी चित्रपटात कथेच्या ओघात न येता मध्ये मध्ये येत राहतात. आणि चित्रपटाचा एकसंथपणा कमी होतो. पण 'कितीदा नव्याने' खूप सुंदर आणि हळुवार वाटतं हे सुद्धा तितकंच खरं.
पण या दोन गोष्टी सोडल्या तर सर्व गोष्टी छान झाल्या आहेत. पटकथेचा जीव जरी लहान असला तरी सतीश ने एक दिग्दर्शक म्हणून केलेली साधी, सहज आणि सोपी मांडणी भावते. मनस्विनीचे संवाद तर नेहमीसारखेचं साधे(सामान्य नव्हे) आहेत.
अंकुशचं व्हॉइस ओव्हर नरेशन पण मस्त आहे. ते चित्रपटात (खास करून पहिल्या टप्प्यात) कमालीची जान आणतं.
अभिनयात सुद्धा ती दोघे सोडली तर सगळ्यांनीच कमाल केली आहे. मला जास्त सहज वाटले ते तेजश्री(सगळे अंदाज चुकीचे ठरवत) आणि अंकुश(बाय डिफॉल्ट).
एकूणच काय... 'ती सध्या काय करते' फ्रेश आहे, तरल आहे, नॉस्टॅलजीया देणारा आहे आणि चित्रपट पाहून झाल्यावर तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न नक्की येईल असा आहे. (मला याचा अनुभव नाही म्हणा😉)
- आशुतोष😊

Comments

Popular Posts