काँग स्कल आयलँड: २ तासांचा थरार !
काँग: स्कल आयलँड हा २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या पीटर जॅकसनच्या किंग काँग चा दुसरा भाग. थिएटर मध्ये
पाहण्याचा योग आला नाही पण काल पाहिला. आवर्जून एखादा सिनेमा पाहायचा असेल तर मी
त्याचा ट्रेलर सुद्धा पाहत नाही. जरा वियर्ड वाटेल. पण ही गोष्ट माझ्यासाठी नेहमीच
वर्क झाली आहे. आणि या बद्दल उत्सुकता वाटण्यासाठी २००५ मध्ये प्रदर्शित झालेला
कींग काँग माझ्यासाठी पुरेसा होता.
स्पिलबर्ग
च्या जॉज(थोड्या वेगळ्या मार्गाने जातो हे मान्य), ज्युरासिक
पार्क पासून सुरू झालेली आणि कींग काँग, ऍनाकोंडा, गॉडझिला सारख्या चित्रपटांनी
सुरू ठेवलेली संकल्पना स्कल आयलँड यशस्वीपणे पुढे नेतो. एखाद्या महाकाय, भयंकर पशूला इतिहास, उत्क्रांती
आणि फॅन्टसी यांच्या आधाराने आणि VFX चा पुरेपूर वापर करून रिअलिझम मध्ये पेश करायचं
ही संकल्पना त्यावेळी अभिनव होती. पण नंतरच्या काळात त्याच साच्यात बसणारे अनेक
चित्रपट येऊन गेले. त्यातलं नावीन्य कमी झालं. स्पिलबर्ग ची स्पेशल, श्वास रोखून धरायला लावणारी ट्रीटमेंट सुद्धा मिसिंग होती. मी
सुद्धा त्या जॉनर पासून दूर गेलो. पण यावेळी मात्र ही सगळीच समीकरणं मस्त जुळून
आली आहेत. आणि स्कल आयलँड या जॉनर मध्ये अगदी वरच्या पंगतीत बसेल.
त्याच्या
सिनेमॅटिक ब्रिलीयन्स मुळे सुद्धा असेल पण तो मला माझ्या पिढीचा वाटतो आणि बहुतेक
त्यामुळेच जास्त जवळचा सुद्धा.
या
जॉनर मधील बहुतेक सर्व चित्रपट जो मार्ग अवलंबतात, जो
निसर्ग संवर्धनाचा संदेश देतात तोच सर्व प्रकार इथे सुद्धा घडतो. किंग काँग आणि
इथे आपल्याला बरीच साम्यस्थळे सुद्धा जाणवतात. पारंपारिक पटकथा हा जरी विक पॉइंट
असला तरी सुद्धा हा इतर चित्रपटांपेक्षा उजवा ठरतो.
अर्थात
या विधानाचे समर्थन करण्यासाठी बरीच कारणे देता येतील.
एक
म्हणजे सर्वच कलाकारांचा अभिनय. एकूणात विचार करता शा चित्रपटांमध्ये चांगल्या
अभिनेत्यांचं कास्टिंग सहसा होत नाही. पण इथे टॉम हिडलस्टोन, ब्रि लार्सन, सॅम्युएल जॅकसन ही नावे येत असल्यामुळे हा
चित्रपट अपवाद ठरतो. कॉंग च्या हावभावांवर घेतलेली मेहनत सुद्धा इथे खूप महत्वाची ठरते.
दुसरं
कारण म्हणजे जॉर्डन रॉबर्ट्स या दिग्दर्शकावर असणारा स्पिलबर्गचा प्रभाव.
ज्युरासिक पार्क च्या रिक्रियेशन मध्ये नेमकं काय मिसिंग वाटतं तर तो स्पिलबर्गचा
दिग्दर्शकीय टच ! म्हणजे अगदी छोटी छोटी गोष्ट शेवट पर्यंत ताणून धरायची, प्रेक्षकांचा श्वास रोखून ठेवता येईल अशी प्रसंगात थराराची पेरणी
करायची आणि एका पॉईंट ला येऊन अचानक पणे ती गोष्ट सोडून द्यायची. (मला ज्युरासिक
पार्क २ मधील तो गाडीचा सिन नेहमी आठवतो. पाऊस पडतो आहे, गाडी एक बाजूला कड्यावरून खाली कोसळणार आहे, दुसरीकडून डायनोसोर आक्रमण करतोय आणि गाडीत बसलेले तिघे त्यातून
वाचण्याचा प्रयत्न करत आहेत...) याचा अनुभव मला स्कल आयलँड मध्ये आला. दिग्दर्शक
सिनेमॅटिक कॉन्ट्रास्ट दाखवण्यात सुद्धा यशस्वी झाला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर
एका प्रसंगात काँग एक सोल्जर ला गिळंकृत करतोय तर दुसरीकडे त्यांचा कॅप्टन सॅंडविच
खातोय !
चित्रपटाचा
इम्पॅक्ट वाढवण्यात एडिटिंड, प्रकाश संयोजन, BG स्कोअर आणि सिनेमॅटोग्राफी फार महत्त्वाचं काम करतात. प्रेक्षकाला
वाटणारी भीती, अधून मधून दचकायला लावणारे प्रसंग, बराच काळ हाताच्या मुठी घट्ट आवळून धरायला भाग पाडणारी एक्शन हीच
काय ती या तांत्रिक बाबींना मिळणारी पावती.
लेखक
दिग्दर्शकाला स्कल आयलँड उभं करण्यात सुद्धा कमालीचं यश आलं आहे. तेथील भयभीत, तरीही नेत्रसुखद वातावरण, चित्रविचित्र
पशु, तेथील संस्कृती मधील बारकावे या
साऱ्यातून निर्माण होणारा सस्पेन्स इलेमेंट हे कमालीचं टिपलं आहे.
त्यामुळे
एकदा तरी हा अनुभव घ्यावा हे नक्की.
*
या चित्रपटाचं रॉटन आणि IMDB वरील रेटिंग बघितल्यावर असं लक्षात आलं की याला समीक्षकांनी जास्त
पसंती दिली आहे. यात माझ्यासारख्या सर्व सामान्य प्रेक्षकाला न आवडण्यासारखं काहीच
नाहीये. २ तासांचा थरारक अनुभव हे एवढंच समीकरण आता प्रेक्षकाला नको झालंय की काय ? म्हणजे
आयुष्यातील २ तास एका अनभिन्य वातावरणाचा भाग होऊन त्याचा आनंद घेणे यात गैर ते
काय ! लहानपणी
जे चित्रपट रिपीट मोड वर १०-१० वेळा पाहिले आहेत ते आता एकदा तरी पाहायला काय हरकत
आहे ? असे आपण किती मॅच्युअर झालो आहोत की हा पोरखेळ वाटावा...
या
साऱ्यातून असं जाणवतंय की आपण त्या कलाकृतीचा आनंद घेण्याऐवजी त्यातील चुका
काढायचा प्रयत्न जास्त करतोय. यातून होतंय काय तर मिळणारा आनंद हिरावून घेतला
जातोचं आहे आणि शिवाय फुकटचा मनस्ताप सुद्धा होतोय. मी तरी अजून असा विचार करत नाही.
किंवा समीक्षकांचा वेगळा दृष्टिकोन प्राप्त झालेला नाही. तो असा काही वेगळा असतो
का हे सुद्धा माहीत नाही.
असो...
स्कल आयलँड नक्की बघा !
Comments
Post a Comment