जग्गा जासुस: लॉजिकल/ मॅजिकल ?
तब्बल साडे तीन वर्षे काम सुरू असलेला जग्गा जासुस गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. काम सुरू असलेला म्हणण्यापेक्षा रखडलेला , टप्यांमध्ये चित्रित केलेला असं म्हणूया. भारतातील डिस्नि प्रोडक्शन चा शेवटचा चित्रपट , प्रत्येकवेळी काहीतरी वेगळं पडद्यावर आणणारा दिग्दर्शक अनुराग बसू , रणबीर-अनुरागची जोडी असलेला आणि बऱ्याच पातळ्यांवर वेगळा ठरणारा बर्फी , जग्गा जासुस च्या ट्रेलर मधील वेगळेपणा आणि त्यातील म्युजिकल अंदाज हे सारं चित्रपटाकडे आकर्षित करणारं होतं. पण चित्रपटाला मिळणारा विचित्र , दोन टोकं गाठणारा क्रिटिकल रिस्पॉन्स प्रचंड द्विधा मनस्थिती करणारा होता. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यात मला जास्त रस होता. आणि बहुतेक याच कारणामुळे काल थेटरात पाहायला गेलो... श्रुती(कतरीना कैफ) एक कॉमिक सिरीज मधून तिच्या समोरच्या मुलाना किंबहुना आपल्याला जग्गाची (रणबीर कपूर) कथा सांगत आहे... तो स्वतः अनाथ आहे. एक दिवस त्याची टुटी फुटीशी (सस्वत चॅटर्जी) भेट होते. मग ते त्याचे फादर फिगर होतात. आणि एक दिवस त्याला सोडून निघून जातात. आणि त्यांना शोधण्यासाठी म्हणून बाहेर पडलेल्या जग्ग...