पिंक
खरंच, कसा आहे ते सांगण्याची गरज आहे का?
विचारतच असाल तर उत्तर 'एकमेव-अद्वितीय' असं काहीसं देता येईल.
हा खरा माझा एक शब्द खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतोय !
तुम्हाला जर या शब्दाची ताकद लक्षात येत नसेल तर मग सांगतोच आता...
हा चित्रपट म्हणजे कठोरपणे भाष्य करणारा, एक वास्तववादी, काळजाला हात घालणारा अनुभव आहे ! जो फक्त केवळ त्या पडद्यापूरता सीमित न राहता आपल्याला सुद्धा त्या साऱ्या घटनेचा, प्रवासाचा एक भाग करून घेतो.
शूजीत सिरकारने प्रदर्शित केलेला आणि अनिरुद्ध रॉय चौधरीने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट पहिल्या फ्रेम पासूनच प्रेक्षकांवर छाप पाडायला सुरुवात करतो. आणि मग असा काही खिळवून ठेवतो की डोळ्याच्या पापण्या लवण्यास सुद्धा परवानगी देत नाही.
अगदी १०० पासूनच सुरु झालेला त्याचा आलेख खाली येण्याचा नाव सोडाच तर अगदी इन्फिनिटी पर्यंत चढत जातो.
कुठल्याही क्षणी, कुठल्याही भागात खाली येतच नाही म्हणजे काय?
शंतनु मोईत्राच म्युजीक, बॅकग्राऊंड स्कोर ज्या खुबीने वापरलय ते केवळ अप्रतिम! कारी कारी हे गीत तर खरंच अंगावर शहारे आणतं. आणि विषयातील गडादपणा तीव्रतेने दाखवून देते.
चित्रपटातील संवाद देखील तेवढ्याच ताकदीचे.
तांत्रिक बाबतींमध्ये (एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, छायांकन...अगदी सगळ्याच हो) एकदम चोख आहे.
कोर्ट रूम ड्राम तर असा काही जमलाय की मी आत्तापर्यंत तरी एवढा जबरदस्त नाही पाहिलेला.
पटकथा, चित्रपटाचा वेग कुठे कमतरताच नाही. विषयाची तीव्रता, गांभीर्याता, मानसिकता जी काही शेवट पर्यंत ठेवलीय ती वाखाणण्याजोगी.
अभिनयाच्या बाबतीत काय बोलायचं?
तसं नव्हे, मी कोण अमिताभ बच्चन आणि पियुष मिश्रा यांनी चोख काम केलंय हे सांगणारा ! त्या दोघांना एकत्र पाहणं म्हणजे पर्वणीच. खरंच ग्रेट आहेत ही माणसं.
अमिताभ सर तर खजाना आहेत अभिनयाचा. त्यांची नजर, शब्दफेक, चाल केवळ लाजवाब.
तापसी पन्नू... काय ताकदीची अभिनेत्री आहे. वाह !
कीर्ती क्लहरी, अँड्रीया टेरींग आणि इतर सगळ्यांनीच आपली नाणी चोख आणि खणखणीत वाजवली आहेत.
आणि या सगळ्यांना घेऊन अनिरुद्ध रॉय चौधरीने काय दिग्दर्शन केलय ! ज्या प्रकारे त्याने विषयाची उत्कंठावर्धक मांडणी केलीय ती सुंदरच.
एकूणच काय एकमेव-अद्वितीय.
एवढं सांगून जर तुम्ही चित्रपट चुकवालाच तर मग तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच.
*
बर पहिल्यांदाच मराठीत समीक्षण केलंय. कसं वाटलं ते नक्की सांगा.
अतिशयोक्ती वाटत असेल तर ती अजिबातच नाही हे खरं.
शेवटच्या वाक्यामुळे दुखावला गेला असाल तर क्षमस्व.
पण जर पिंक चुकवालाच तर मात्र तुम्ही खरंच...
-आशुतोष :)

Comments

Popular Posts