विसारनायी
या वर्षी भारताकडून अधिकृतरित्या ऑस्कर साठी विसारनायी हा तमिळ चित्रपट जाणार आहे हे कालच जाहीर झाले.
साधारणपणे ज्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा राष्ट्रीय पुरस्कार मिळतो तोच चित्रपट ऑस्कर साठी पाठवला जातो.
यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला 'बाहुबली द बीगिनींग' हा चित्रपट पाठवला नाही हीच खरंतर सुखावणारी गोष्ट.
यावर्षीच्या या स्पर्धेमध्ये उडता पंजाब, विसारनायी, सैराट, तिथी, नीरजा आणि निल बाते सन्नाटा असे सहा चित्रपट होते.
आणि या सहा चित्रपटांतून विसारनायी या चित्रपटाची निवड होणे ही खरंच चांगली बाब आहे.
सैराट हा जरी चित्रपट म्हणून सरस असला तरी विसारनायी
हाच ऑस्कर साठीची निवड म्हणून योग्य आहे असे मला वाटते.
एम. चंद्रकुमार यांच्या 'लॉक अप' या कादंबरीवर आधारित असलेला आणि वेत्रीमारंन यांनी दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट, सर्वोत्कृष्ट एडिटिंग आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता असे ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते.
भारतीय पोलीस खात्याची गडद आणि अंधारी बाजू अतिशय तीव्रतेने दाखवणाऱ्या विसारनायी मध्ये अतिप्रचंड क्रौर्य आणि दाहकता आहे.
चित्रपटातील प्रत्येक प्रसंग हा संवेदनशील, अंगावर शहारा आणणारा आणि कथेमध्ये आत खेचणारा आहे.
विसारनायी जेवढा त्याच्या कथेशी प्रामाणिक राहतो तेवढाच तो तांत्रिकदृष्ट्या ही प्रबळ आहे.
मध्यंतरानंतर तो थोडाफार प्रेडीक्टेबल होतो पण त्यातील उत्सुकता आणि तीव्रता शेवट पर्यंत कमी होत नाही हे ही तितकाच खरं.
आत्तापर्यंत पाहिलेल्या अनेक चित्रपटांपैकी सगळ्यात 'प्रभावी' असे त्याचे वर्णन करणे जास्त योग्य ठरेल.
*
● कमजोर मनाचे असाल तर यापासून दूरच राहा.
● आपणास पाहण्याची जर 'तीव्र' इच्छा असेल तर माझ्याकडे सबटायटल्स सहित आहे.
● आणि हो, यावर्षीच्या ऑस्कर च्या अपेक्षा सुद्धा नक्कीच वाढल्या आहेत.
-आशुतोष :)

Comments

Popular Posts